‘मी स्वत: पूरग्रस्त भागात राहून सेवा करणार’ – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर आला आणि सगळं उध्वस्त करून गेला. या महापुरात जीवीतहानी आणि मोठी वित्तहानी झाली. पुर ओसरल्यानंतर पुन्हा पुरग्रस्तांनी आपल्या घरांकडे धाव घेतली. आयुष्यभराची कमाई, तीळ तीळ साठवलेल्या पैशातून ऊभा केलेला संसार आता छिन्नविछीन्न अवस्थेत त्यांना दिसत आहेत.

पूर ओसरल्यानंतर आता पीडीतांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रस्न आहे. यासाठी राज्यातील सर्व सेवाभावी संस्था, समाजातील जाणता घटक, राजकीय नेते सर्वच मदतीसाठी पुढे येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुरग्रस्तांना मदत पुरवली आहे.

डॉक्टरांचे पथक देखील पूरग्रस्त भागात रवाना झाले आहेत. अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली, तसेच त्या स्वत पुरग्रस्त भागात जाऊन राहणार आणि सेवा करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. पूर ओसरला. मोठ्या कष्टानं ऊभारलेलं घरटं पडून मोडलेलं पाहून त्यांच्या भावनांचा चुराडा झालेला असेल त्यांना भावनीक आधाराचीही गरज आहे. त्यामुळे लागोल तेवढे दिवस लागतील परंतू पुरग्रस्त भागात राहून त्यांना धीर देण्यासाठी मी स्वत तिथे राहणार असल्याचे सुप्रिया म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या –

पूरबाधितांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून पाठविल्या ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू

विदर्भ व मराठवाड्यातील शासकीय इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणार – डॉ. परिणय फुके

अलमट्टीतून ५ लाख ४० हजार, कोयनेतून ४८ हजार ८९३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.