शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून या झोपलेल्या सरकारला जागे करीन – समरजितसिंग घाटगे

समरजितसिंग घाटगे

कोल्हापूर- भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हे सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शिवार संवाद अभियानांतर्गत गोरंबे (ता. कागल) येथील शेतकऱ्यांच्या त्यांनी व्यथा जाणून घेतल्या. या शिवार संवाद  दौऱ्याच्या सात आठवड्याच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हक्काची मदत शासनाने दिली नाही तर शेतकरी महामार्ग रोखतील असा इशारा गोरंबे परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी त्यांनी दिला.

बळीराजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे असे यावेळी शेतकरी बांधवांना वचन दिले. शेतकऱ्यावर एकामागून एक संकटांची मालिकाच सुरू आहे. राज्य सरकार मात्र मदत करण्याऐवजी घोषणांवर घोषणा करीत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा प्रत्यक्ष समजून घेऊन सरकारपर्यंत पोहोचवून या झोपलेल्या सरकारला जागे करीन असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दरम्यान सरकारने तातडीने मदत केली नाही तर शेतकरी जो निर्णय घेतील, त्यासोबत आपण राहणार असल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील, शाहूचे संचालक डी एस पाटील, महादेव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, शाहूचे संचालक मारूती पाटील, पी डी चौगुले संजय पाटील, सुनिल मगदूम, प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –