मी राहुल गांधींना विचारु इच्छितो, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?

राहुल गांधी

मेहसाणा – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज १४वा दिवस आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून काल त्यांनी भारत बंद ची हाक दिली होती. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सर्वपक्षीय व कामगार संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

दरम्यान,काल भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदीजी शेतकऱ्यांडून चोरी बंद करा अशी टीका त्यांनी केली आहे. भारत बंदला समर्थन देऊन अन्नदात्याचा संघर्ष यशस्वी करा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.

यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक माहिती आहे का?असा सवाल विचारला आहे.काँग्रेस ज्या सुधारणांची वकीली करायची आज त्यालाच काँग्रेसकडून विरोध करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मी राहुल गांधींना विचारु इच्छितो, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?असं रूपाणी यांनी निशाणा साधला आहे.

रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज होणार असलेली पूर्वनियोजित बैठकही रद्द करण्याचा निर्णय कृषी संघटनांनी घेतला आहे.

दरम्यान, रात्री अकरा वाजल्यानंतरही सरकार आणि शेतकरी यांच्यात एकमत झाले नाही. त्यामुळे अमित शहा यांचा प्रयत्न असफल झाला. तसेच सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आज (बुधवार) होणारी बैठक सुद्धा रद्द करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –