कृषी कायदे रद्द झाले नाही तर ‘एनडीए’तून बाहेर पडू – हनुमान बेनिवाल

नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – नव्या कृषी कायद्यांविरोधात सहा दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकराने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे. तर, नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांनीही भाजपवर दबाव वाढवला आहे. राजस्थानमधील राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख व लोकसभेतील खासदार हनुमान बेनिवाल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात व नवे कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

देशाचा अन्नदाता कडाक्याच्या थंडीत आणि करोनाच्या संकटात आंदोलन करत असून केंद्र सरकारसाठी ही बाब योग्य नव्हे. कृषी कायदे रद्द झाले नाही तर ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा इशाराही बेनिवाल यांनी दिला आहे. याच मुद्यावरून शिरोमणी अकाली दलही ‘एनडीए’तून बाहेर पडला होता.

महत्वाच्या बातम्या –