… तर देशात अराजक माजेल – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : गेल्या अनके दिवसांपासून दिल्लीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. केंद्र सरकार विरोधात दाद मागण्यासाठी केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात देखील धाव घेतली होती. केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने स्पष्ट केलं होत की, जनतेने निवडून दिलेलं सरकार हे राज्यपालांपेक्षा महत्वाच आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय राज्यपालांनी मान्य करणे बंधनकारक आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर शुक्रवारी केजरीवालांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात दिल्लीतील विकास कामांत सरकारची मदत करणे तसेच कोर्टाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करण्याबाबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी काही मुद्द्यांवर राज्यपालांनी केजरीवालांना सहकार्य करण्यास नकार दिला. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे सरकारने पालन केले नाहीत तर देशात अराजक माजेल असे केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांच्या मुद्यावरून नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात काल झालेल्या बैठकीत चर्चा झाली मात्र बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्याना देण्यास राज्यपालांनी नकार दिलाय तो अधिकार केंद्राचा असून, त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचं त्यांनी म्हंटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी म्हंटलं आहे की, जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे सरकारने पालन केले नाहीत तर देशात अराजक माजेल.