साधारण खोकला म्हणून दुर्लक्ष करत असाल तर ठरू शकते जीवघेणे : वाचा सविस्तर.

साधारण

सर्दी खोकला(Cough) हा बऱ्याचदा होऊन जात असतो. म्हणून नागरिक हि खोकला(Cough) झाल्यास जास्त महत्व देत नाही. व डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात. तसेच हिवाळ्यात येणारा खोकला हा सामान्य म्हणून ग्राह्य धरला जातो.

पण जर तुमचा सतत येणार खोकला(Cough) अनेक आठवडे बरा झाला नसेल तर अनेक गोष्टी असू शकतात. अशा परिस्थिती तुम्ही घरेलू उपचार न करता डॉक्टरांना भेटणे खूप महत्वाचे असते.

खोकलाCough) येणे याचे असंख्य कारणे आहेत म्हणजेच कि संसर्ग,एलर्जी, धूम्रपान इत्यादी.

जाणून घेऊयात खोकल्याचेCough) प्रकार –
१) तीव्र खोकला –
तीव्र खोकलाCough) हा साधारण २ ते ३ आठवडे राहतो आणि स्वतःच बरा होतो.

२) जुनाट खोकला –
जुनाट खोकलाCough) हा साधारण ८ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहतो आणि काही मोठ्या आजरांचे लक्षण सुद्धा असू शकते.

३) सौम्य खोकला –
जो कि साधारण ३ ते ८ आठवडे टिकू शकतो.

बघूयायत तीव्र खोकल्याचीCough) कारणे काय आहेत –

१) धूम्रपान – खूप काळापर्यंत राहणाऱ्या खोकल्याचेCough) कारण हे धूम्रपान देखील असू शकते. जे लोक धूम्रपान सेवन करतात अश्याना खोकल्याची समस्या हि कायम जाणवत असते. कारण तंबाखूमध्ये जे रसायन असते ते फुफुसात जाऊन त्याची जळजळ होते खोकल्यामुळं शरीर ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असतो .जे धूम्रपान करतात ते ह्या खोकल्यावर जास्त लक्ष देत नाहीत परंतु भविष्यात त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

२) कोविड १९ – कोरोना हा आजरा झाल्यास देखील दीर्घकाळ खोकलाCough) राहू शकतो हे देखील खोकल्याचे कारण आहे. खोकला हे कोरोनाच्या लक्षणांपैकी एक आहे. तसेच कोरोनात कोरडा खोकलाCough) येत राहणे हे मुख्य लक्षण आहे.

३) इन्फेक्शन – इन्फेक्शन मध्ये आपल्यला जाणवते कि आपली सर्दी बरी होऊन जाते पण खोकलाचीCough) समस्या आपल्याला दीर्घकाळ जाणवते या प्रकारचा
खोकलाCough) हा १ ते २ महिना टिकून राहू शकतो.

4) कर्करोग फुफ्सांचा – हा कर्करोग हा दीर्घकाळ खोकल्याचेCough) कारण असू शकते तसेच फुफुसाचा कर्करोग झाल्यास खोकताना रक्त येते. आणि धूम्रपान करणे हि फुफ्सांच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. तसेच वाढते वय प्रदूषण यामुळे देखील कर्करोग होत आहे. खोकताना रक्त येत असेल तसेच ३ ते ४ आठवडे खोकला असेल तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या –