आता एका आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची ऊस थकबाकी भागवा; नाहीतर साखर कारखाना प्रमुखावर होणार कठोर कारवाई

ऊस थकबाकी

शाहजहांपूर, उत्तर प्रदेश – ऊस ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. मुख्यत्वे, गुळ, साखरेसाठी पिकवण्यात येते. ऊस भारत व ब्राझील या देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृृृतमध्ये इक्षुुदंड असे नाव आहे.

साखर उत्पादनाच्या क्षेत्रात भारतात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 173 सहकारी आणि 23 खाजगी साखर कारखाने आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 96 साखर कारखाने आहेत. परंतु साखर उत्पादनाच्या क्षेत्रात भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर असले तरीही कारखाने ही ऊस उत्पादकांची थकबाकी भागवण्यात विलंब करतात.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना साखर कारखान्यांकडून त्यांची थकबाकी भागवण्यासाठी उशीर होत असल्याने  डीएम इंद्र विक्रम सिंह यांनी सांगितले की, एका आठवड्याच्या आत शंभर टक्के ऊस थकबाकी ही भागवावी लागेल. शेतकऱ्यांची ऊस थकबाकी पूर्ण न भागवल्यास साखर कारखान्याचे प्लांट प्रमुख यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

कलेक्टर सभागृहात उस थकबाकीबाबतच्या बैठकीमध्ये डीएम यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या गाळप हंगामातील साखर कारखाने मकसुदापूर, तिलहर, पुवाया या तीन कारखान्याचे मिळून एकूण 119.31 करोड थकबाकी देय आहे. यावेळी डीएम यांनी सांगितले की, एका आठवड्यात शंभर टक्के थकबाकी भागवली नाही तर साखर कारखान्याच्या प्लांट प्रमुखांविरोधात कारवाई केली जाईल. त्यामुळे डीएम यांनी आता सर्व साखर कारखान्याच्या प्रमुखांना आदेशांचे पालन करुन थकबाकी भागवण्याचे कडक आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या –