जर इथेनॉल उद्योग २ लाख कोटींपर्यंत बनत असेल तर एक लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खिशात – नितिन गडकरी

नितिन गडकरी

नवी दिल्ली – ऊसाच्या रसापासुन साखर बनवितांना मळी (मोलॅसिस) तयार होते. त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते. हा द्रवपदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोल, डिझेल आदी इंधनात मिसळुन करता येऊ शकतो. ब्राझिल देश हा या प्रकारचा वापर जास्तीत जास्त करण्यात आघाडीवर आहे. तेथे २५ ते ३०% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळुन वापरले जाते.

तसेच ऊस ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. मुख्यत्वे, गुळ, साखरेसाठी पिकवण्यात येते. ऊस भारत व ब्राझील या देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृृृतमध्ये इक्षुुदंड असे नाव आहे. ऊसापासून मोठया प्रमाणात साखराचे उत्त्पादन देखील घेतले जाते.

साखर निर्याती बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही 60 लाख टन साखर मागील वर्षात निर्यात केली होती आणि त्यासाठी आम्ही 6,000 करोड़ रुपयांचे अनुदान देखील दिले होते. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही 2 लाख करोडच्या इथेनॉलची अर्थव्यवस्था बनवू. आता तर सध्या, हे फक्त 20,000 करोड़ रुपये आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, जर इथेनॉलच्या उद्योगात 2 लाख करोडची अर्थव्यवस्था बनत असेल तर 1 लाख करोड रुपये शेतकऱ्यांच्या खिशात जातील.जर इथेनॉलचा वापर वाढला तर प्रदूषण देखील कमी होतील.

गडकरी बोलताना पुढे म्हणाले की, इथेनॉल स्वस्त आहे आणि सरकार कडून निश्चित पेट्रोल सह इथेनॉलच्या समिश्रण ध्येयांना पूर्ण करण्यासाठी इथेनॉल च्या अधिक उत्पादनाची गरज आहे. तसेच सरकार इथेनॉल खरेदी करण्यास देखील तयार आहे. आज देशात आठ लाख कोटी रुपयांचं कच्चं तेल आयात करण्यात आलंय. आता आम्ही 2 लाख करोड़ रुपयांची अर्थव्यवस्था बनवण्याबाबत बोलत आहोत. येणाऱ्या काळात विमाने इथेनॉल ने बनलेल्या इंधनावर चालतील आणि शेतकऱ्यांना पैसा मिळेल.

तसेच यावेळी गडकरी असे देखील म्हणाले की, शेतकऱ्यांनी येऊन कृषी कायदे समजून घ्यायला हवेत. आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या सगळ्या सूचनांवर विचार करायला तयार आहे. आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांनावर अन्याय होणार नाही. या आंदोलनाचा दुरुपयोग करण्यासाठी काही जणांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे अयोग्य आहे. शेतकऱ्यांनी हे कायदे काय आहेत ते समजून घ्यायला हवं, असं गडकरींनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या –