मुंबई – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 19वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता वर्तवली आज आहे. मात्र, 18 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे. नव्या जाचक कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले आहे.
सरकार आमचं म्हणणं ऐकायला तयार नसेल तर आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन यंदाच्या प्रजासत्ताक दिनी इंडिया गेटवर धडक देऊन संचलनात सहभागी होऊ, असं भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
सामान्य जनेतला त्रास होईल, असं कुठलंच काम आम्ही आतापर्यंत केलेलं नाही. मात्र, आमचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही तर मात्र आम्ही आंदोलन तीव्र करू आणि सीमेवर जाम करू. 26 जानेवारी रोजी शेतकरी इंडिया गेटवर धडकतील आणि राजपथवर पार पडणाऱ्या संचलनात सहभागी होतील. असे टिकैत यांनी संदितले आहेत. तर यापूर्वीचे कायदेही शेतकऱ्यांचं नुकसान करणारेच होते. मात्र, यावेळी सरकारने जे तीन नवीन कायदे आणले आहेत, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होणार
- रोज फक्त 20 मिनिटे चालण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
- ‘या’ जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी नोंदणी
- ‘हे’ औषध फक्त 24 तासांतच करणार कोरोनाचा खात्मा