शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीन दिवसांत तोडगा काढा नाही तर, महाराष्ट्रातील हजारो शेतकरी घेऊन दिल्ली गाठणार- बच्चू कडू

बच्चू कडू

मुंबई – अनेक दिवसांपासून सुरू असलेले दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणासह देशभरातील अनेक राज्य पेटून उठले आहे. तिथे आजही आंदोलन सुरु आहेत. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबचे शेतकरी आक्रमक होत दिल्लीत पोहोचले आहेत. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय चलो दिल्लीचा नारा देत शेतकऱ्यांचा प्रश्नावर ३ दिवसात तोडगा काढण्याचे अल्टिमेटम दिले आहे.

केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. त्यांना हरियाणाच्या सीमेवर अडवून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री बच्चू कडू यांनी या शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. चलो दिल्लीचा नारा देत कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ३ दिवसात तोडगा काढण्याचे अल्टिमेटम दिले आहे. तोडगा न काढल्यास महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसह दिल्लीत धडकणार असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार’, असेही मंत्री कडू म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या –