मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास मी भाजपात प्रवेश करेन – बच्चू कडू

बच्चू कडू

अमरावती – केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयके मंजूर करुन घेत त्याचे कायद्यांमध्ये रुपांतर केले. मात्र या कायद्यांना विरोधकांनी विरोध दर्शविला आहे. कृषी कायद्यांबद्दल लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मोदीजी जसे 56 इंच छाती छाती असल्याचे सांगतात त्याप्रमाणे त्यांनी या बिलात केवळ दोन ओळी टाकाव्यात, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती येथे बोलताना सांगतिले.

याबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले, कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल, शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला ५० टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करणे आणि हमीभावानूसार शेतमाल खरेदी करणे, या दोन वाक्यांच्या समावेश करावा. मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास भाजपमध्ये प्रवेश करु, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आली होती. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ही विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली. तिन्ही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने बळीराजाच्या हितार्थ कृषी कायद्यामध्ये बदल करून बळीराजाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारा नवीन कृषी कायदा अंमलात आणला. शेतमालाला दुप्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्यामुळे हा नवीन कायदा शेतकºयांच्या हितासाठी ऐतिहासिक ठरणार आहे, असे मत केंद्रीय मानव संसाधन मंत्री संजय धोत्रे यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या –