त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!

त्वचेवर खाज येते असेल तर मग करा 'हे' घरगुती उपाय! खाज

वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका आपल्या त्वचेला बसत असतो. खाज येणे, पुरळ येणे, यांसारख्या त्वचेशी निगडीत समस्या उद्भवत असतात. या खाजेचे रुपांतर गंभीर स्वरुपाच्या स्कीन इन्फेक्शनमध्ये होतं. त्वचेवर लाल  चट्टे येणे, डाग पडणे, एग्जीमा, सोसायसीस यांसारखे त्वचा रोग खाजेकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात. पण या आजारांपासून बचाव कारायचा असल्यास काय करायला हवं ते जाणून घ्या. चला तर मग जाणून घेऊ….

  • जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त आहे ! पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते.त्यामुळे कंड कमी करून त्वचेचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो.
  • व्हिटामिन सी’ने युक्त  लिंबात ब्लिचिंग क्षमतादेखील असल्याने त्वचेचा कंड कमी होण्यास  मदत होते. तसेच लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्वचेच्या ज्या भागावर  खाज सुटते तेथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. वार्‍यावरच हे थेंब सुकू द्या. काहीवेळाने तुम्हाला त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.
  • तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत  करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या  भागावर चोळा. किंवा  पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाजtvache येत असलेल्या भागावर लावा.
  • कधी त्वचेच्या शुष्कतेमुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला  खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर  कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये पडून  रहा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला तेल लावा.
  • कोरफडातील औषधी गुणधर्म त्वचेतील दमटपणा योग्य प्रमाणात राखण्यास व त्वचेला थंडावा देण्यास मदत करतात. कोरफडातील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.

महत्वाच्या बातम्या –