…..तर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जारी केला जाईल – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई – राज्यात काल मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती. तर त्यात मंत्रिमंडळ बैठक 15 ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉल्सची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती.

तर त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. तर  या निर्णयामुळे हॉटेलचालकांच्या लढ्याला यश आले आहे. 15 ऑगस्टपासून हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु राज्यातील नाट्यगृह,चित्रपटगृह, आणि धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्णयांची माहिती दिली. तसेच ते यावेळी बोलताना म्हणाले कि, ‘राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली जरी ज्या दिवशी राज्याची ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रीक टनच्या वर पोहोचेल तेव्हा राज्यात लगेच कडक लॉकडाऊन जारी केला जाईल,’ असा महत्वपूर्ण निर्णय आज आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –