‘बियाणे’ घेताना अडचण आल्यास, शेतकरी बांधव थेट करू शकतात ‘मोबाईल’ द्वारे तक्रार !

शेतकरी

शेतकरी(Farmers) बांधवांसाठी येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यासाठी तक्रार(Complaint) कुठे करायची, कशी करायची याची पुरेशी माहिती नसते नसते परंतु आता खरीप हंगामा उरू झाला असून बियाणे – खते घेण्यास अडचण आल्यास शेतकरी थेट व्हाट्सअँप द्वारे तक्रार(Complaint) करू शकणार आहे. कृषी आयुक्तालयाकडून माहिती समोर आली आहे.
साठेबाजी, गुणवत्ता व किमंत च्या बाबतीत काही शेतकऱ्यांना अडचण आली तर थेट व्हाट्सअँप वर आलेली तक्रारही दाखल घेण्यात येणार आहे. व त्याचे निराकरण कृषी आयुक्तालय करतील.

तक्रार(Complaint) नोंदवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक –
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष – ८४४६११७५००, ८४४६२२१७५०, ८४४६३३१७५०
टोल फ्री क्रमांक – १८००२३४०००
ई-मेल –controlroom.qc.maharshtra@gmail.com

अशी करा तक्रार(Complaint) – नाव व पत्ता पाठवावा तसेच संपर्क क्रमांक, तक्रारीचा थोडक्यात तपशील द्यावा तसेच कोऱ्या कागदावर तक्रार लिहून फोटो पाठवल्यास तो हि ग्राह्य धरला जाईल असे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –