जर या आंदोलनात एकही शेतकरी नाही, तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे?

नवी दिल्ली – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता वर्तवली आज आहे. मात्र, 19 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाने भारत बंदही पाळला होता.
या बंदला विविध राज्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. सत्ताधारी पक्षातील नेते मात्र या शेतकरी आंदोलनात राजकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप सातत्याने करताना दिसत आहेत. काही सत्ताधारी नेत्यांनी तर या आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी किंवा तत्सम लोक असल्याचाही आरोप केला आहे. असे आरोप करणाऱ्या मंत्र्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी कोंडीत पकडणारा प्रश्न विचारला.

“सत्ताधारी मंत्र्यांनी शेती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तान आणि चीनचे एजंट, नक्षलवादी म्हटलं आहे. हल्ली तर त्यांचा उल्लेख हे मंत्री तुकडे तुकडे गँगमधील सदस्य असाही करताना दिसत आहेत. जर तुम्ही असे आरोप करत आहात तर याचा अर्थ या हजारो आंदोलनकर्त्यांमध्ये एकही शेतकरी नाही. जर या आंदोलनात एकही शेतकरी नाही, तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे?”, असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता वर्तवली आज आहे. मात्र, 19 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे. नव्या जाचक कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर आज (सोमवारी) प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. या उपोषणाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

महत्वाच्या बातम्या –