पंचनामे झाले नाही तर शेतकरी सापडेल संकटात – इंद्रनिल नाईक

शेतकरी

पुसद : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतीवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांच्या पिकमालाचे पंचनामे झाले नसल्यास ते तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत तसेच त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा अन्यथा शेतकरी संकटात सापडेल,  अशी मागणी आमदार इंद्रनिल नाईक यांनी जिल्हाधिकार्यांना केली आहे.

पुसद व महागाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकास कोम फुटले कपाशी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकर्‍यांवर संकट आले आहे. या संकटामुळे शेतकर्‍यांना खचून जाऊ नये व यातून सावरण्यासाठी त्यांना तत्काळ मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकर्‍यांना वेळीच मदत देण्यासाठी कार्यवाही करावी, असेही इंद्रनिल नाईक यांनी जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे सुचित केले आहे.

महत्वाच्या बातम्या –