पाणीपुरी खात असाल तर सावधान!

कोल्हापूर – मिशन बिगिन अगेन अंतर्गत येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्केपेक्षा जास्त नाही इतक्या क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली होती.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्/आऊटलेटस्, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

त्यानंतर ठीक ठिकाणी रस्त्यावर खाण्याच्या गाड्या देखील सुरु झाल्या, जागोजागी लोकांची गर्दी देखील खाण्याच्या गाड्यावर दिसू लागली कोरोना संसर्ग विसरून खाण्याच्या शौकीनांची  गर्दी रस्त्यावर दिसू लागली. अशातच कोल्हापूर मधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोल्हापूरमध्ये रस्त्यावरील पाणीपुरीच्या ठेल्यावर एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळला चक्क पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पाणी स्वछतागृहा वरच्या टाकीतीले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरकरांनी या पाणीपुरी ठेल्याचा चांगलाच कार्यक्रम केला. देशभरामध्ये कोरोनाचा थैमान चालू असताना देखील स्वच्छतेची काळजी न घेता लोकांना कोरोनच्या आहारी ढकलत आहेत. तरी सर्व खाद्य प्रेमींनी बाहेरच खाणे टाळणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या –