भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरणार असाल तर शेतकरी तुमचा ‘बाप’ आहे, लक्षता ठेवा – राजू शेट्टी

मोदी

सांगली – केंद्रातील मोदी सरकार ज्या शेतकर्‍यांच्या हितासाठी कायदे करीत असल्याचे भासवत आहे. ते कायदे जर शेतकर्‍यांना नकोच असतील तर ते कायदे करताच कशाला. भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरणार असाल तर शेतकरी तुमचा ‘बाप’ आहे, लक्षता ठेवा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. ते सांगलीतील किसान समन्वय समितीच्या सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील होते. शिवसेनेचे नेते बजरंग पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते अ‍ॅड. सुभाष पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

ते म्हणाले, पंजाबमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनाला इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती व्हावयाची नसेल तर वेळीच कायदे मागे घ्या. शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी मोदी सरकार तीन काळ्या कायद्यांचा घाट घालत आहे. ते कायदे शेतकर्‍यांना नकोच आहेत. त्याला विरोध करण्यासाठी देशातील शेतकरी दिल्लीत तळ ठोकून बसला आहे. परंतु शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी कायदे करीत असल्याचे सांगून मोदी सरकारने शेतकर्‍यांना लुटीचा धंदा सुरू केला आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कोंबडीची मुंडी मुरगाळून नेण्याचा प्रकार आहे. तर एफसीआय तोट्यात आणून तो भांडवलादारांच्या घशात घालण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कृषी कायद्यांचा आधार घेवून बडे उद्योगपती अंबानी आणि अदानी यांच्या घशात सगळी शेती घालण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. तो वेळीच ओळखून हे कायदे रद्दच झाले पाहिजेत, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. आणि ती सरकारला मान्य करावीच लागेल.

महत्वाच्या बातम्या –