आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार

फळ

जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात (Diet) अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते.

यासोबत डोळ्याचा समस्या आणि इतर आजारही तुम्हाला होण्याचा धोका अधिक असतो. अ जीवनसत्त्व तुमची प्रतिकारक शक्ती वाढवतं. एका अहवालाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा आणि क्षयरोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

साधारणपणे पिवळ्या, नारिंगी रंगाच्या सर्व पदार्थातून अ जीवनसत्त्व मिळते. कॉड माशाचे तेल, लिवर, अंडी या प्राणिज स्रोतांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण सर्वात जास्त असते. शिवाय दूध, दुधाचे पदार्थ, सर्व नारिंगी-पिवळ्या भाज्या जसे आंबा, गाजर, टोमॅटो, लाल भोपळा, आंबा, पपई, सर्व हिरव्या पालेभाज्या यातूनही अ जीवनसत्त्व मिळतं. त्यामुळे रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या –