जर तुम्ही कोरोना काळात फटाके फोडताय तर ‘हे’ वाचा

पुणे – कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची ॲंटिव्हायरल औषधे अजूनतरी (२०२० साल) उपलब्ध नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिन्यांपासून सगळे जण कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क व हॅंड सॅनिटायझर सातत्याने वापरात असतो. आता ही आपली सवयच बनलेली आहे. कोणीही हाताला सॅनिटायझर लावून काडेपेटीतील काडी पेटवू नका, नाहीतर मोठ्या प्रमाणातहात भाजण्याची शक्‍यता आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल मोठ्या प्रमाणात असते. सॅनिटायझरमध्ये ज्वलनाला मदत करणारे अल्कोहोलचे मोठे प्रमाण असल्याने फटाके वाजवण्यापूर्वी हाताला हॅंड सॅनिटायझर लावणे.

महत्वाच्या बातम्या –