हाडे बळकट व मजबूत ठेवायची आहेत, तर मग करा हे उपाय

हाडे

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकट असणे आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम याद्वारे आपली हाडे बळकट होण्यास मदत होते. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D ह्या दोन पोषकघटकांची आवश्यकता असते. यासाठी खाली आपली हाडे मजबूत व बळकट करण्याचे उपाय दिले आहेत.

चला तर मग जाणून घेऊयात हाडे बळकट व मजबूत होण्यासाठी उपाय….

  • दूध व दुधजन्य पदार्थ – दुधामध्ये कॅल्शियम मुबलक असते. एक कप दुधामध्ये 280 mg कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी दररोज कपभर दुधाचा आहारात समावेश असावा. दुधामध्ये प्रोटीनही भरपूर असल्याने मांसपेशींच्या आरोग्यासाठीही ते उपयोगी ठरते. याशिवाय दुधाचे पदार्थ म्हणजे दही, लोणी, तूप, ताक, पनीर यामुळेही भरपूर कॅल्शियम मिळत असते.
  • मासे – माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही.
  • मनुके – ऑस्टियोपिरॉसिस असलेल्या महिलांसाठी मुठभर मनुके खाणे गरजेचे आहे. त्यात इनुलिन नावाचे फायबर असते जे  शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. अर्थरायटिसच्या समस्येवरही मनुके खाणे फायदेशीर ठरते.
  • हिरव्या पालेभाज्या – कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D साठी आहारात विविध हिरव्या पालेभाज्या खाव्यात. पालक, ब्रोकोली, शतावरी यांमध्ये कॅल्शियम मुबलक असते.
  • तीळ आणि मेथीच्या बिया – तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 100 ग्रॅम तिळामधून 975 mg कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी आहारात तिळाची चटणी समाविष्ट करावी. याचप्रमाणे मेथी बियांचा वापरही आहारात करू शकता. मेथीच्या बियांमध्येही कॅल्शियम भरपूर असते.

महत्वाच्या बातम्या –

कोरोनाबाधितांवर आयुर्वेदिक औषधांचा प्रयोग; आयुर्वेदिक उपचाराला यश

जर ऊसाचे पैसे भागवले नाही तर विधानसभेत उठवणार मुद्दा