हवामान खात्याचा अंदाज; सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार

नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या ९७ टक्के पाऊस बरसणार आहे.
भारतीय हवामान खात्याकडून यंदाच्या मोसमातला पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी स्कायमेटने देखील सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा एप्रिल महिन्यातच उन्हाचा पार चाळीशी पार करताना दिसत आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. सध्या वातावरणातील बदल, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरून हा अंदाज लावण्यात आला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा १०० % पाऊस यंदा पडेल.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले होते. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.

स्कायमेटनुसार कोणत्या महिन्यात किती पाऊस?
जून -111 %
जुलै – 97 %
ऑगस्ट – 96 %
सप्टेंबर – 101 %