मच्छिमार व्यावसायिकांना मुद्रा लोन तातडीने देण्याची कार्यवाही करावी – भागवत कराड

मच्छिमार

औरंगाबाद – जिल्ह्यात जवळपास 4 हजार मच्छिमार (Fisherman) व्यावसायिक असून या व्यवसायासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँकांनी मच्छिमार (Fisherman)  व्यवसायिकांच्या मागणीनुसार मुद्रा लोन नियमानुसार तातडीने देण्याबाबतची कार्यवाही  करण्याची सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी बैठकीस उपस्थित संबंधित सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना केली.

मच्छिमार व्यावसायिकांना मुद्रा लोन मिळण्यासंबधी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय विभाग श्रीमती दीक्षित यांच्यासह सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी  मच्छिमार व्यावसायिकांना मुद्रा लोन अंतर्गत प्रस्ताव मंजूर होण्यात अडचणी येत असल्याबाबतच्या समस्या मच्छिमार  (Fisherman) संघटनेने मांडल्या

यावेळी जिल्हाधिकारी यांनी बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी मुद्रा लोन अधिक प्रमाणात वितरीत केल्याबद्दल या बँकांचे अभिनंदन केले. बँकांनी मच्छिमार व्यावसायिकांचे मुद्रा लोन संबंधिचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावे अशी सूचना बँक अधिकाऱ्यांकडून मान्य करण्यात आली. मच्छिमार व्यावसायिकांना बॅकांनी किसान क्रेडीट कार्ड देण्याबाबतच्या निर्णयाचे स्वागत करुन केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांचा मच्छिमार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –