नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ सर्वे करावा – डॉ. अशोक उईके

डॉ. अशोक उईके

यवतमाळ – खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवून आर्थिक मदत देण्याचे नियोजन केले जाईल. त्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ सर्वे करावा, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बाभूळगाव तालुक्यातील मादणी, कृष्णापूर, कोटंबा, नायगाव आदी गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी ना.उईके यांनी केली. यावेळी ते गावकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे पैसे जमा न होणे, पीक विम्यापासून वंचित राहणे, तुरीचे चुकारे न मिळणे आदी समस्या मांडल्या.

या गावात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, कोतवाल आणि बळीराजा चेतना अभियान समितीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतीच्या सोबतच कर्जमाफी, कर्जाचे पुनर्गठन, तुरीचे चुकारे याबाबत पंचनामा करावा, असा अहवाल २ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकड पाठवावा , अशा सूचना ना. डॉ. अशोक उईके यांनी उपस्थित अधिकारी यांना केल्या. सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने पिके हातून जाण्याची वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

धक्कादायक : प्रदूषण करणारे सर्वाधिक ५ हजार ३०६ उद्योग पुणे विभागात

अनुसूचित जमातींसाठी पाच नवीन जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयांचा प्रस्ताव सादर करण्याचे डॉ. परिणय फुके यांचे निर्देश