बीड जिल्हयातील बंद असलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पंकजा मुंडे

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत बीड जिल्हयातील दहा दिवसांपासून बंद असलेले कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे शासकीय कापूस खरेदी केंद्रे पूर्ववत सुरू करणे बाबत व शेतकऱ्यांच्या खरेदीचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करा, अशी देखील मागणी देखील त्यांनी केली आहे.

मराठवाड्यात मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. त्यात महाराष्ट्रासह मराठवाड्यात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतक-यांची आर्थिक पिळवणूक व नुकसान होवू नये म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महारसंघाने २७ नोव्हेंबर पासून केली होती. बीड जिल्ह्यात साधारण २४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली तथापि ती सर्वच खरेदी केंद्र आता २० जानेवारी पासून बंद झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावाने.खाजगी व्यापार्यांना कापूस विकावा लागत आहे, परिणामी शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनीयतेची शपथ – पंकजा मुंडे

कापसाची खेडा खरेदी गतीने सुरू, दर ५१०० वर स्थिर

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रीतम मुंडे धावल्या ; केंद्र सरकारकडे मागितली मदत

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन