Immunity Booster Tips | हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल, तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो

Immunity Booster Tips | हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल, तर करा 'या' आयुर्वेदिक टिप्स फॉलो

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) जवळपास प्रत्येकाचा आवडता ऋतू असतो. हिवाळ्यामध्ये हवामान थंड आणि जेवढे आल्हाददायक असते, तेवढाच या ऋतूमध्ये आजाराचा धोका जास्त असतो. हिवाळा आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction) सोबत घेऊन येतो. हिवाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन ही जवळजवळ प्रत्येकाची समस्या बनते. त्यामुळे थंडीमध्ये सतर्क राहण्याची प्रत्येकाला गरज असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये या आजारांना समोर जाण्यासाठी आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत ठेवणे गरजेचे असते. कारण हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत असेल, तर आपण अनेक समस्यांपासून लांब राहू शकतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हिवाळ्यामध्ये आपण आपल्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करू शकतो. त्याबद्दलच आम्ही या बातमीच्या माध्यमातून आज माहिती सांगणार आहोत.

हळद

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात सहज सापडणारा हळद एक मसाला पदार्थ आणि त्याचबरोबर एक आयुर्वेदिक औषधे आहे. हळद अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. कारण हळदीमध्ये अँटीइम्प्लिमेंटरी आणि अँटीअँक्सीडेंट गुणधर्म आढळतात. जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतात. त्याचबरोबर हळदीच्या सेवनाने बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि घसा दुखीला ही आराम मिळू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात हळदीचे सेवन करणे नेहमी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आवळा

आवळा विटामिन सी चा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. आवळ्याचे सेवनाने रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने वाढू शकते. त्याचबरोबर आवळा खाल्ल्याने मानसिक आरोग्य देखील सुधारू शकते. केस गळतीसाठी थांबवण्यासाठी सुद्धा आवळा हा एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे हिवाळ्यात रोज एका आवळ्याचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्य आणि केस दोन्ही निरोगी राहू शकते.

अंजीर आणि दूध

अंजिरामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये अँटीअँक्सीडेंटचे प्रमाण देखील भरपूर असते. जी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करू शकते. त्याचबरोबर यामध्ये प्रोटीन, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन आणि फायबर मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. अंजिराचे नियमित सेवन केल्याने आपल्या स्टॅमिनाही वाढू शकतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये अंजीराचे दुधासोबत सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या