गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – अजित पवार

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी

बारामती येथे उपमुख्यमंत्र्यांकडून विकासकामांचाही आढावा

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजेगर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.  

बारामती  येथील विद्या प्रतिष्‍ठानच्या व्हीआयटी हॉल येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन‘ व विकास कामांबाबत आढावा बैठक‘ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला नगराध्यक्ष पोर्णिमा तावरेपंचायत समिती सभापती नीता बारवकरअप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहितेमहावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडेउपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळेतहसिलदार विजय पाटील आदींसह विविध विभागाचे अधिकारीप्रतिनिधी  उपस्थित होते.

ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – बच्चू कडू

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणालेकोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईलयाकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घेण्याचे तसेच नागरिकांनी मास्कसॅनिटायझरचा वापर करावागर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. कोविडशी लढण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या आर्थिक वर्षामध्ये ज्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहेत्याकरिता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वेळेत पूर्णपणे वापर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केल्या.

आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात

यावेळी  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी तांदूळवाङी येथील पिण्‍याच्‍या पाण्याचा तलाव व सुरु आसलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. बारामती तालुक्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत याची खबरदारी पोलीस विभागाने घ्यावीअवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या कडक सूचना त्‍यांनी यावेळी पोलिसांना दिल्या.

youtube.com/watch?v=KGc_pusSKmM  

महत्वाच्या बातम्या – 

कापूसखरेदी खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु

शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहोचवा – कृषीमंत्री