राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

शाळा

नवी दिल्ली –  गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात  कोरोना रोगाने थैमान घातला आहे. तर अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. त्यातच कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

याच पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही. आता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यासाठी अद्याप वेट अँड वॉच अशीच भूमिका असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकारने २३ जिल्ह्यांत निर्बंध शिथील केल्यानंतरही चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

यात कोणतीही सूट देण्यात आली नाही. तसेच, राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळेही बंदच राहणार आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालयांबाबत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात अजून काही दिवस थांबावे लागेल असे म्हटले आहे.

राज्यात शाळा सुरू करण्याची घाई नको, त्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल, असे आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. परदेशात आणखी नवीन स्ट्रेन सापडले आहेत, त्यातच महाराष्ट्रात कोविडच्या केसेस अधिक आहेत. दुसरीकडे लहान मुलांवर लसीकरण ट्रायल सुरू आहे. त्यामुळे, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल, असे पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –