राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; राज्यातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता

बंद

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता फक्त राज्याच्या नव्हे तर देशाच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यात ५८ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.

दरम्यान,संचारबंदील लावूनही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने सरकार चिंतेत असून या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक दुपारी साडेतीन वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लॉकडाऊन कडक करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संचारबंदीनंतरही राज्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत नाहीये. त्यामुळे अनेक मंत्र्यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची मागणी केली आहे. यावर या बैठकीत चर्चा होऊन आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान याबाबतचे संकेत कालच काही मंत्र्यांनी दिले आहेत.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेतली तर लोकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या काही दिवसांत असेच होत राहिले तर नाईलाजास्तव लवकरच राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असा इशारा आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

तर दुसऱ्या बाजूला कडक लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील म्हटलं आहे. लॉकडाऊन आतापर्यंत 30 तारखेपर्यंत आहे. ती मुदत वाढवावी लागेल, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –