नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान (PM-Kisan) योजनेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.
पंतप्रधान किसान (PM-Kisan) योजनेचे आत्तापर्यंत १० हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून दर ४ महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. त्यामुळे या योजनेतून आत्तापर्यंत पात्र शेतकर्यांना सुमारे 20 हजार रुपयांची मदत केली गेली असल्याचे समजत आहे.
पीएम किसान सम्मान निधि योजणेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, तर आता चांगली बातमी आहे कि पीएम किसान सम्मान निधि योजनेचा अकरावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळणार असल्याने या योजनेचे पात्र शेतकरी मोठे आनंदी असल्याचे यावेळी बघायला मिळाले.
पीएम किसान योजनेत मोदींनी केला मोठा बदल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी मोदी सरकारने नियम बदलले आहेत. आता पीएम किसानच्या नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शिधापत्रिका क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
पीएम किसान (PM Kisan) योजनेसाठी आता ‘हे’ कागदपत्र द्यावे लागेल ….
जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला शिधापत्रिका क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच, नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.
महत्वाच्या बातम्या –
- पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 2 फेब्रुवारी २०२२
- बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजन योजना मदतनीस – बच्चू कडू
- बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी – हसन मुश्रीफ
- अर्थसंकल्पात झाला निर्णय आता तुमच्या जमिनीचाही ‘आधार क्रमांक’असेल : जाणून घ्या फायदा !
- राज्यातील साखर उत्पादनात वाढ; आतापर्यंत ७२९.०२ लाख टन साखर उत्पादन