नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan) योजनेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा अकरावा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.
प्रधानमंत्री किसान (PM Kisan) योजनेचे आत्तापर्यंत १० हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. त्यामुळे या योजनेतून आत्तापर्यंत पात्र शेतकर्यांना सुमारे 20 हजार रुपयांची मदत केली गेली असल्याचे समजत आहे.
पीएम किसान सम्मान निधि योजणेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, तर चांगली बातमी आहे कि पीएम किसान सम्मान निधि योजणेचा अकरावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यात या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळणार असल्याने या योजनेचे पात्र शेतकरी मोठे आनंदी असल्याचे यावेळी बघायला मिळाले.
पीएम किसान योजनेत मोदींनी केला मोठा बदल
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी मोदी सरकारने नियम बदलले आहेत. आता पीएम किसानच्या नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शिधापत्रिका क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
पंतप्रधान किसान योजनेचे पुढीलप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा – यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा. मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही PM Kisan संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जा. यानंतर Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’वर क्लिक करा. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. हे केल्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल. प्रधानमंत्री किसान योजना.
महत्वाच्या बातम्या –
- लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
- अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – अनिल परब
- कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत – नितीन राऊत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
- ९० टक्के सबसिडीवर मागास वर्गीय व सर्वसामान्य गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू
- आज कुठे पाऊस पडणार? हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज