शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ई-केवायसी पूर्ण कराल तरच मिळेल पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; जाणून घ्या कशी करावी

अर्थसंकल्पात

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan)  योजनेचा दहावा हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला गेला आहे.  १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केला गेला आहे.  या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

पीएम किसान सम्मान निधि योजनेचा ११वा हप्ता आता एप्रिल मध्ये येणार असल्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी, पीएम किसान चा अकरावा हप्ता अशाच पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे ज्या पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली असेल. येणाऱ्या एप्रिल महिन्यात अकरावा हप्ता मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांनी जर 31 मार्च पर्यंत ई-केवायसी केली नाही, तर अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित देखील राहावे लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी 31 मार्च पर्यंत पूर्ण करून घ्यावी.

ई-केवायसी कशी करणार? जाऊन घ्या 

पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर आपण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने किसान ॲप द्वारे केवायसी करू शकता. नाहीत आपण आपल्या जवळच्या सेवा केंद्रावर भेट देऊन ई-केवायसी करू शकता.  केवायसी करण्यासाठी मोबाईल नंबर तसेच आपले बँक अकाउंट आधारशी लिंक असणे अनिवार्य असते.

पंतप्रधान किसान योजनेचे पुढीलप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा –  यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.  मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही Get Report’ वर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही PM Kisan संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जा. यानंतर Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’वर क्लिक करा. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. हे केल्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल.  प्रधानमंत्री किसान योजना.

महत्वाच्या बातम्या –