……तर काही तासातच ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार

संचारबंदी

औरंगाबाद – औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा वाढत चाललेला आहे. या वर कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. परिस्थिती सध्या तरी हाताबाहेर गेलेली नाही. परंतू नागरिक जर अंशत: लॉकडाऊनचे नियम तंतोतंत पालन करत नसल्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येत खुप मोठया प्रमाणात वाढ होत आहे. तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा लागेल. आणि मी या बाबत मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे.

आणि जर गरज पडली तर काही तासातच कडक लॉकडाऊनचा निर्णय देखील घेतला जावू शकेल असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरामध्ये गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालता आहे. आणि ५ मार्च पासून कोरोना रुग्णांचा आकडा दररोज १ हजारांच्या पुढे वाढत आहे. असेच जर चालत राहिले तर औरंगाबाद शहरासह जिल्हातील आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण भरती करण्यासाठी जागा उपलब्ध राहणार नसल्याची परिस्थिती समोर येत आहे. आणि कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान कडक लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णांच्या आकड्यांवर अंकुश आणि प्रतिबंध आणण्यात यश आले होते.

तसेच सर्व लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे प्रमुख तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे देखील लॉकडाऊन लागले तरच कोरोना रुग्ण वाढीवर नियंत्रण तसेच अंकुश मिळवू शकू असे मत मांडले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठपातळीवरील वैद्यकीय अधिकारी यांनी लॉकडाऊन लावण्यावर सहमती दर्शवली आहे. आता त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी , पोलिस आयुक्त, महानगर पालिकेचे आयुक्त देखील उपस्थित होते.

दरम्यान दाेन आठवड्यापासून शनिवार, रविवारी पुर्ण लॉकडाऊन तसेच रात्री ८ पासून रात्रीचा कर्फ्यू देखील करण्यात आला आहे. तर आता याही पेक्षा कडक तपासणी करुन विनाकारण रस्त्यावर, बाजारपेठेमध्ये फिरणाऱ्यांवर कडक उपाययोजना करणे देखील सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्री यांनी या वेळी सांगितली आहे.

महत्वाच्या बातम्या –