राज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात तर रिकव्हरी रेटमध्ये झाली मोठी वाढ

कोरोना

मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात आज दिवसभरात नव्याने २८,४३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आनंदाची बाब म्हणजे राज्यात आज तब्बल ५२,८९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा गेले काही दिवस जास्त असल्याने रिकव्हरी रेटमध्ये चांगली वाढ झाली आहे. तर दुर्दैवाने आज राज्यामध्ये ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद महाराष्ट्रात करण्यात येत होती. दरम्यान, राज्यातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम सध्या दिसून येत आहे. परंतु राज्यावरील कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या –