कठिण काळात बँकेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे – भावना गवळी

वाशीम : यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. अशा कठिण काळात बँकेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. बँक प्रशासनाने अर्जदार शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी दिले आहेत.

देशातल्या 5 बँकांत मोठी भरती, अर्ज करून मिळवा नोकरी

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शेतकरी कष्टकरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, राज्याचे लोकाभिमुख नेतृत्व मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले आहे. आता या खरिप हंगामात शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपाची गती अतिशय धिमी असल्याने शेतकरी सावकाराच्या जाळ्यात सापडला आहे.

धन्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

या पार्श्ववभूमीवर बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा बॅकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टच्या आत पिककर्ज घेण्यासाठी अर्ज केले हे अर्ज प्रलंबित राहीले अशा शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात एक असंही गाव आहे; ‘या’ गावात चहा कधीच विकला जात नाही

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती