‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीने अवघ्या सात दिवसात उभारले १०० बेडचे ‘कोव्हीड केअर सेंटर’

परभणी – राज्यातील पहिले कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेले कोव्हीड केअर सेंटर देणाऱ्या परभणी जिल्ह्याने आणखी एक किमया केली आहे. अवघ्या सात दिवसात सर्व सुविधांसह १०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचा मानही परभणी जिल्ह्याने पटकावला आहे. सेलू इथल्या बाजार समितीने हे सेंटर उभारले आहे.

मानवत इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकतेच कोव्हीड केअर सेंटर सुरू केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे राज्यातील पहिलेच केंद्र आहे. त्यात आता केवळ ७ दिवसात सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने १०० बेडचे सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुगळीकर यांच्या हस्ते झाले.

या सेंटरच्या उद्घाटनाला पालकमंत्री नवाब मलिक यांनी ऑनलाईन हजेरी लावली. पालकमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतूक केले असून प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक मदत करण्याचा सूचना देखील दिल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आवाहन करण्यात आल्या नंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –