काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी तर विदर्भात पाऊस सुरु राहील

बर्फवृष्टी

उत्तर भारतामध्ये, आता पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेने सरकत आहे. यामुळे पंजाबमध्ये एक चक्रवाती परिस्थिती विकसित असून त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वरच्या भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. तसेच हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे हवामान कोरडे राहील.

मध्य भारतात, एक ट्रफ पूर्व उत्तर प्रदेश ते तेलंगाणा पर्यंत विस्तारित आहे. यामुळे पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात एक-दोन ठिकाणी पाऊस पडेल. पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात मध्ये हवामान कोरडे राहील.

पूर्व भारतात, ओडिशामध्ये आता पाऊस आणखी वाढेल. झारखंडमध्येही जोरदार पाऊस पडेल. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे हवामान कोरडे राहील. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात एक-दोन ठिकाणी पाऊस पडेल.  शेवटी दक्षिण भारतात, उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये विखुरलेला पाऊस सुरू राहील.

source – skymetweather

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; तूर खरेदी केंद्र कधी उघडतील याची शाश्वती नाही

अबब ! मुख्यमंत्री आता दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता

नागपूरच्या ग्राहकांना गोड संत्र्याची मेजवानी, दररोज बाजारात २०० टेम्पोची आवक

मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता