नागपुरात पावसामुळे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने घरसले खाली

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील वातावरण बदलले आहे. नागपूरमध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने शुक्रवारी म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२० रोजी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने खाली घरसले होते. त्यामुळे दिवसभर नागपूरमध्ये थंड हवा पसरली होती. शुक्रवारी म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे आणि सायंकाळी नागपूरमध्ये चांगलाच पाऊस झाला. त्यामुळे थंडी देखील वाढली.

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१२८.४१ मिमी पावसाची नोंद

हवामान विभागानुसार मराठवाड्यात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्कुलेशन आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे विदर्भातील काही भागात पाऊस पडत आहे. पुढील एक-दोन दिवस आकाशात ढग दाटून येतील. हलका पाऊसही पडेल. दिवसभर अधूनमधून पाऊस येत-जात होता. नागपुरात शुक्रवारी णजेच ७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ५.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात यवतमाळमध्ये सकाळी ८.३० वाजेपर्यंत सर्वाधिक १० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय ब्रह्मपुरीमध्ये ४.२ मि.मी., चंद्रपूरमध्ये ३ मि.मी., गडचिरोली ३.६ मि.मी., गोंदिया २ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.