कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, ओल्या वाटाण्याचे दर समाधानकारक

कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, ओल्या वाटाण्याचे दर समाधानकारक gavar bhaji

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, ओल्या वाटाण्याचे दर समाधानकारक होते. या वेळी गवरीला कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० ते ५०० रुपये दर होता. तर ओल्या वाटाण्यास दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक या सप्ताहात वाढलेलीच राहिली. यामुळे दरात वाढ होऊ शकली नाही. टोमॅटोस दहा किलोस २० ते ६० रुपये दर होता.

तकरी कृषी प्रदर्शनाचे वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. घेवड्यास दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर होता.कारल्यास दहा किलोस १०० ते १५० रुपये दर होता. भेंडीस दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, चाकवत आदी भाज्यांना शेकडा ६०० ते ८०० रुपये दर होता. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर होता. मेथीस शेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाला.ओल्या मिरचीची ९०० ते १००० पोती आवक होती.  पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची तेरा ते चौदा हजार पेंढ्या आवक होती. फळांमध्ये डाळिंबाला किलोस २० ते ४० रुपये दर होता. पेरूला डागास २०० ते ४०० रुपये दर होता. द्राक्षाला किलोस १५ ते ३५ रुपये दर मिळाला.