मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने घेतला दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

बँक भरती परीक्षा

मुंबई – राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने दहावीच्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर याबाबतची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या करतील अस राजेश टोपे म्हणाले आहेत. सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती. यामध्ये महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. याबाबतची नियमावली काही तासातच सरकार जाहीर करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली आहे. तर उद्या रात्री ८ वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे.

महत्वाच्या बातम्या –