देशात करोनाचा कहर, गेल्या 24 तासांत तब्ब्ल ३ लाख ७९ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद

कोरोना

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने बाधित होत आहेत. औषधं आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इतकच काय तर स्मशानभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंग लिस्ट आहे.

देशात दिवसागणिक नव्या कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी नवनवे उच्चांक गाठत आहे. दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 379,257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3645 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,69,507 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 360,960 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

देशात 18 ते 25 एप्रिल या काळात 22 लाख 49 हजार नवे रुग्ण वाढले तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या 28 लाखांहून अधिक झाली. तसेच या कालावधीत कोरोनामुळे 16 हजार जणांचा बळी गेला आहे. या आठवड्यात देशात इतके रुग्ण वाढले की तो विश्वविक्रमच झाला. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मात्र अद्यापही 1.13 टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82,6 टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या –