‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४ हजार ९५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोना

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे कोरोनाची रुग्ण संख्या काही कमी होत नाहीये.

पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ९५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख २२ हजार ९८२ इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ३८९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ६६ हजार ८०९ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात २५ हजार ५०४ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १६ लाख ९६ हजार ९४१ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५० हजार ४७३ रुग्णांपैकी १,०१४ रुग्ण गंभीर तर ४,७४६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ७०० इतकी झाली आहे.

दरम्यान कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच आठ दिवसाचा लॉकडाऊन करायचा इशारा दिला. आता कडक निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे. असे ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –