राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतके’ रुग्ण बरे होऊन गेले घरी

कोरोना

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासात ७,५६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात एकूण ६१,५१,९५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ % एवढे झाले आहे. तर राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. गेल्या २४ तासात 4,505 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत 61 लाख 51 हजार 956रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.76टक्के आहे. राज्यात गेल्या २४ तासात 68 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 44 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९७,२५,६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,५७,८३३ (१२.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२१,६८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 208 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 372 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,15,389 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –