राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कोरोना

मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे.

दरम्यान, राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केलं जातंय. राज्यात आज 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 31 हजार 671 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 424 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत एकूण 53,07,874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  93.24 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,43,50,186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,92,920 (16.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,54,976 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 16,078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या –