मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4978937 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 91.06% एवढे झाले आहे. तर दुर्दैवाने आज राज्यामध्ये ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद महाराष्ट्रात करण्यात येत होती. दरम्यान, राज्यातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम सध्या दिसून येत आहे. परंतु राज्यावरील कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- निवडलेली अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार – दादाजी भुसे
- चांगली बातमी – राज्याच्या रिकव्हरी रेट झाली मोठी वाढ; दिवसभरात तब्ब्ल ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त
- ‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक
- ‘खरबूज’ खाल्ल्याने दूर राहातील ‘हे’ आजार, जाणून घ्या