‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक

कोरोना

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र, आता शहरातील कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होत आहे. पुण्यात आज नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा दुप्पटीहून अधिक आहे. मात्र नव्य कोरोना बाधितांची संख्या देखील काल पेक्षा अधिक आहे.

पुणे शहरात आज नव्याने १ हजार १६४ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, २ हजार ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, उपचार घेणाऱ्या (ऍक्टिव्ह) १५ हजार २३२ रुग्णांपैकी १,३४८ रुग्ण गंभीर तर ४ हजार ७५४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तसेच, ४८ रुग्णांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –