जिल्ह्यात गेल्या २४ तासात तब्ब्ल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची झाली वाढ

कोरोना

बीड – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, मात्र अशातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरी कडे म्युकरमायकोसिस, यात होरपळून निघतोय सामान्य माणूस. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात बुधवारी पुन्हा नव्या बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. तसेच २४ तासांत जिल्ह्यात ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. नवे ७०३ रुग्ण निष्पन्न झाले, तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी ५ हजार ५०१ जणांची चाचणी केली. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात ७०३ नवे रुग्ण आढळले तर, ४ हजार ७९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४२, आष्टी ९२, बीड २२६, धारुर २५, गेवराई ६६, केज ६४, माजलगाव ३०, परळी १५, पाटोदा ४६, शिरूर ६३ व वडवणी तालुक्यातील ३३ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, मागील २४ तासांत ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८२ हजार ५७२ इतकी झाली असून पैकी ७६ हजार ७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यंत १९१६ जणांचा बळी गेला असून सध्या ५ हजार ५८० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –