‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट

ओमायक्रॉन

पुणे – गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र, आता शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम दिसून येत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा हा कमी होत असून कोरोनामुक्तांचा आकडा देखील सातत्याने कमी होत आहे.

पुणे शहरात आज नव्याने १ हजार ३१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ५९ हजार ३०३ इतकी झाली आहे. तर, शहरातील २ हजार ९८५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ३१ हजार ००८ झाली आहे.

दरम्यन, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या (ऍक्टिव्ह रुग्ण)२० हजार ५८९ रुग्णांपैकी १,४१५ रुग्ण गंभीर तर ५५९४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. यासोबतच, ४७ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हे महत्वाचे असून पुणेकरांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

हत्वाच्या बातम्या –