मागील पाच वर्षांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात एकूण १५९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी ९०१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ९० कोटींची आर्थिक मदत मिळाली. विविध कारणांमुळे ६१६ आत्महत्येची प्रकरणे शासनाने अपात्र ठरवली, तर ७४ प्रकरणांची चौकशी सुरू असल्याने संबंधित कुटुबांना मदतीची प्रतीक्षा आहे.
शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकाळातच सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्यांचा प्रदेश म्हणून पश्चिम विदर्भ ओळखला जातो. त्याचे लोण आता पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या धानपट्टय़ात तसेच व चंद्रपूर, गडचिरोली या नक्षलप्रभावित जिल्ह्य़ातही पोहोचले आहे. मागील पाच वर्षांत या भागातील सहा जिल्ह्य़ात एकूण १५९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या तपशीलात आहे.
दिवसाची सुरवात करा या 7 गोष्टींनी
यापैकी ९०१ प्रकरणात शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ९१ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. ६१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारी मदतीच्या निकषात बसत नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. ७४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी २० लाख रुपये अदा https://t.co/umIHODOqdf
— Krushi Nama (@krushinama) January 25, 2020