‘या’ जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; तब्ब्ल १३१ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव

कोरोना

नांदेड – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यात ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनची चिंता वाढली आहे. मुखेड तालुक्याचे आरोग्य पुन्हा एकवार बिघडले असून तालुक्यात कोरोनाचा कहर गत काही दिवसांपासून वेगाने सुरु आहे.कोरोना २ लाटेत १३१ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. १२ गावे प्रतिबंधीत जाहीर करण्यात आली असून ५२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.वाढत्या रुग्ण संख्येने व आरोग्य विभागाच्या तोकड्या सुविधामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

तालुक्यात सध्या ४०० कोरोना बाधीत रुग्ण असून समर्पित कोविड सेंटर, आयटीआय कोविड सेंटर आणि गृह विलगीकरणात हे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य केंद्र कार्यालयातून देण्यात आली आहे तालुक्यात आतापर्यत ४ हजार २०० जण कोरोना बाधीत झाल्याची नोंद असली तरी हा आकडा आणखीन मोठा असण्याची शक्यता आहे. कारण बाहेरगावी जाऊन तपासणी, उपचार घेणाऱ्यांची संख्याही खूप आहे. कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान वेगाने आली आहे.शेकडोंच्या संख्येने रुग्ण कोरोनाबाधीत झाले आहेत. कोरोना बाधीत रुग्ण संख्येचे प्रमाण पाहता तालुक्याची आरोग्य यंत्रणा कोलमडून जात आहे. तज्ञ डोकटर्सच्या नियुक्त्या करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. उप जिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु होऊन वर्ष झाले तरी अद्याप तज्ञ डॉक्टर्सच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. उप जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवली मात्र ऑक्सिजनची सुविधा दिली गेली नाही. कोविड रुग्णांसाठी सिटी स्कॅन मशीन सुरु करावी अशी मागणी अजूनही होत आहे.

महत्वाच्या बातम्या –